सुखाचा शोध आणि आधुनिक आव्हाने
“सर्वेपि सुखिनः संतु” ही संकल्पना भारतीय परंपरेत खोलवर रुजलेली आहे. चारही वेद, उपनिषदे, गीता तसेच संतसाहित्य यात सर्वत्र “सर्वजनहिताय, सर्वजनसुखाय” ही भावना कमीजास्त प्रमाणात आढळते. सुख केवळ वैयक्तिक नाही, तर सामूहिक असावे, ही धारणा प्राचीनतम आहे. भारतीय परंपरेतील पुरुषार्थचतुष्ट्य – धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष – ह्यांतूनही सुखाची कल्पना व्यक्त होते. येथे अर्थ आणि काम …